साताऱ्यात कारभारी बदलासाठी रस्सीखेच
उपनगराध्यक्षपदासाठी किशोर शिंदेंना पसंती
सातारा – पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांचा अपवाद वगळता सातारा पालिकेच्या पाच सभापतींचे राजीनामे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. आता कारभारी बदलासाठी सातारा विकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. सभापती बदलाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.
विद्यमान सभापतींना लोकसभा निवडणुकांमुळे अठरा महिने कामाची संधी मिळाली. मात्र, पुन्हा राजकीय बदलांची चर्चा सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी ताबडतोब श्रीकांत आंबेकर यांचा अपवाद वगळता उपनगराध्यक्षांसह पाच विषय समिती सभापतींचे राजीनामे घेतले.
प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा संतुलित दुवा म्हणून संयमी स्वभावाच्या किशोर शिंदे यांच्या नावाला उपनगराध्यक्षपदासाठी पसंती देण्यात आली आहे. ऍड. दत्ता बनकर यांनी सर्व राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले. जिल्हा प्रशासनाकडून नव्या सभापती निवडींचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी किशोर शिंदे यांची मजबूत दावेदारी होती. त्यांच्या नावाला उदयनराजे भोसले यांनी हिरवा कंदिल दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय आरोग्य सभापतिपदासाठी विशाल जाधव, बांधकाम विभागासाठी सविता फाळके, नियोजन सभापती म्हणून सुमती खुटाळे, महिला बालकल्याण सभापतीपदासाठी सुनीता पवार, स्थायी समिती सदस्य म्हणून ऍड. दत्ता बनकर, सुजाता राजेमहाडिक ही नावे चर्चेत आली आहेत. या नावांच्या निश्चितीसाठी सातारा विकास आघाडीच्या गोटात रस्सीखेच सुरु झाली आहे. येत्या आठवड्यात सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल.
गतिमान व संतुलित शासन यांच्या स्पष्ट सूचना उदयनराजे यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांना दिल्या आहेत. वायुसेनेचे एन-32 विमान अखेर सापडले मेचुका या भागात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेत होती. त्याशिवाय सुखोई 30 एमकेआय, एमके17, चिता आणि सी 130 जे सारखी लढाऊ विमाने देखील या शोध मोहिमेत सहभागी झाली होती. त्याच बरोबर वायुदलाने या विमानाची माहिती पुरवणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.