नवी दिल्ली : दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार,चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये चित्राने गळफास घेतला.
View this post on Instagram
नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री २.३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघं एकत्रदेखील रहात होते. विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स (Pandian Stores) या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती.
View this post on Instagram
चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातच चित्राने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय, सहकलाकार आणि फॅन्सही धक्क्यात आहेत.