मेक्‍सिकोत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची मायदेशी रवानगी

नवी दिल्ली : मेक्‍सिकोमध्ये अवैधरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली 311 भारतीयांची मेक्‍सिकन सरकारने मायदेशी रवानगी केली आहे. मेक्‍सिकोने सर्व भारतीयांना दिल्लीला पाठवले असून आज सकाळी बोइंग 747-400 चार्टर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले असल्याचे सांगण्यात येत आहे. मेक्‍सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिटूजने याबाबतची माहिती दिली आहे.

भारतात परत पाठवलेल्या लोकांकडे आवश्‍यक ती कागदपत्रे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मेक्‍सिकोने परत पाठवलेले भारतीय 60 फेडरल मायग्रेशन एजंटच्या मदतीने तिथे पोहचले होते. चौकशीत त्यांच्याकडे कागदपत्रेही नसल्याचे समोर आले. वास्तव्यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे जवळ नसतानाही संबंधित लोक गेल्या काही महिन्यांपासून तिथे होते. भारतात माघारी पाठवण्यात आलेल्या लोकांनी अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी एजंटना 25 ते 30 लाख रुपये दिल्याची धक्कादायक माहितीही सध्या समोर येत आहे.

मेक्‍सिको बॉर्डरवरून सर्व भारतीयांना अमेरिकेच्या सीमेत प्रवेश आणि नोकरी देऊ असे एजंटने सांगितले होते. या रकमेत विमान प्रवास, मेक्‍सिकोत राहण्याची व्यवस्था, जेवणाचाही समावेश होता. तसेच एजंटनी एक आठवड्यापासून एक महिन्यापर्यंतचा वेळ अमेरिकेत प्रवेशासाठी दिला असल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. मेक्‍सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिटूटनुसार, देशात वास्तव्य करण्यासाठी गरजेची असलेली कागदपत्रे माघारी पाठवण्यात आलेल्या प्रवाशांकडे नव्हती. त्या सर्वांना इमिग्रेशन अथॉरिटीसमोर हजर करण्यात आले. मेक्‍सिकोने ओकासा, बाजा कॅलिफोर्निया, वरॉक्रूझ, चिपास, सोनोरा, मेक्‍सिको सिटी इथे प्रशासनाच्या समोर अवैध वास्तव्य करणाऱ्या प्रवाशांना हजर करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)