पुणे-चंदिगढ विमानसेवेचा खोळंबा

धुक्‍याचा फटका : उड्डाणास चार तास उशीर

पुणे – पुण्यातून चंदिगढला जाणाऱ्या विमान उड्डाणास तब्बल 4 तास उशीर झाला. चंदिगढहून पुण्यात येणाऱ्या विमानाला उशीर झाल्याने पुण्यातून चंदिगढच्या विमानास विलंब लागल्याचे सांगण्यात आले.

चंदिगढ येथून सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी झाले. परिणामी, पुण्यात हे विमान सकाळी 11.40 ऐवजी दुपारी 3.55 वाजता उतरले. परिणामी, पुण्यातून दुपारी 12.40 ऐवजी सायंकाळी 4.30 वाजता या विमानाने उड्डाण केले. दरम्यान, चंदिगढ येथे असणाऱ्या दाट धुक्‍यामुळे विमानाचे उड्डाण उशिराने झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे लोहगाव विमानतळावरुन चंदिगढला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.