मंचर – मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथून मेंगडेवाडी ते पंढरपूर गणराज पायी दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी 11 वाजता विणा, तुळशी वृंदावन, कलशाचे पूजन करून वारकरी सांप्रदयाचे प्रतिक असलेल्या भगवी पताका वारकऱ्यांनी खांद्यावर घेऊन शेकडो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा जय घोषाने ठेक्यात नाचत होते. यावेळी गावामध्ये भक्तिमय वातावरण झाले होते.
या दिंडीचे यंदाचे 15वे वर्ष असून मेंगडेवाडीतील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. दिंडीमध्ये सुमारे 8 तंबू असून जेवणाची तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली आहे, असे दिंडी संचालक दशरथ मेंगडे यांनी सांगितले.
पारंपरिक पद्धतीने महिलांनी फुगड्या खेळल्या. महिलांनी ज्ञानेश्वर महाराज, पांडुरंगाचे भजन गायले. यावेळी गावातील लहान, थोर तसेच महिला उपस्थित होत्या.