करोना काळात भाडेकरूला प्रवेश नाकारणे पडले महागात

सोसायटीच्या सेक्रटरीविरुद्ध गुन्हा

पुणे – सोसायटीमध्ये नवीन आलेल्या भाडेकरूला वैद्यकीय प्रमाणपत्र मागत प्रवेश नाकारल्याप्रकरणी सोसायटी सेक्रेटरीविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयातील उपनिबंधक स्नेहा संजय जोशी यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची खातरजमा करण्यासाठी जोशी या संबंधित सोसायटीमध्ये गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी तक्रारदार सुधीर मेस्सी (34) आणि सोसायटीचे सेक्रेटरी सुनील शिवतारे (53, रा. रोहन निलय सोसायटी) यांना प्रत्यक्ष बोलावून चौकशी केली. यातील मेस्सी हे संबंधित सोसायटीत नवीन भाडेकरू म्हणून 25 जून रोजी दुपारी पत्नी व मुलांसह दाखल झाले होते.

घरातील साहित्य येथे आणण्यासाठी त्यांनी “मुव्हर्स ऍन्ड पॅकर्स’चे कर्मचारीही आणले होते. यावर शिवतारे यांनी मेस्सी यांना सोसायटीच्या गेटजवळच प्रवेश नाकारला. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय प्रवेश करता येणार नाही, असे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कोणतेही अधिकार किंवा आदेश दिला नसताना त्यांनी परस्पर वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी करोना विषाणू संदर्भात लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.