दातांची नियमित तपासणी, निघालेले दात बसवणे, दातांचे तसेच हिरडय़ांचे दुखणे याच्यावर तत्काळ उपाय करा. हे आपले मौखिक आरोग्य योग्यप्रकारे ठेवण्यास उपयोगी पडते. त्याचबरोबर दातांची झीज रोखण्यासाठी नियमितपणे ब्रश करा, तुमच्या दंतपक्ती मोत्यासारख्या चमकाव्यात याकरिता या टिप्स..
प्रकाशमान व्हा
दररोज ज्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा आहे, त्याने दात घासा, म्हणजे ते पांढरे शुभ्र होतील. त्यामुळे एक उत्तम सुहास्य करण्यासाठी आपला आत्मविश्वास निश्चितपणे बळकट होईल.
हिरडय़ा मजबूत करा
सुस्मित करताना नेहमी आपल्या हिरडय़ा प्रामुख्याने समोरच्याला दिसतात. अशावेळी त्या गुलाबी रंगाच्या असाव्यात, यासाठी व्हाईटेनिंग फ्लॉसचा वापर करा. त्याचबरोबर गुळण्या करत चला म्हणजे त्यातील उजळपणा कायम राहील.
तंतूयुक्त पदार्थ खा
तंतूयुक्त पदार्थ जसे की, सफरचंद, गाजर यांसारखे पदार्थ खाल्यामुळे पृष्ठभागावरील चिकटपणा तसेच डाग निघून जातात आणि त्यामुळे आपले दात पांढरे शुभ्र राहण्यास मदत होते. त्यातून मग आपले हास्य अधिक फुलते.
दातांमधील भेगांवर ध्यान द्या
दात आपापसात घासल्यामुळे त्यांच्यात भेगा पडू शकतात. अशावेळी दंत वैद्याकडे जाऊन तपासणी करता तसेच हे घर्षण थांबवण्यासाठी योग्य उपचार करा. रात्रीच्या वेळी एक चांगला संरक्षक त्यातून मिळू शकेल, जो दातांचे रक्षण करेल.
पोकळी भरून काढा
दातांमधील जागा किंवा पोकळी ही योग्य प्रकारे भरून काढा, त्यामुळे दातांवरील हास्य अधिक आकर्षक दिसेल. लोकांना आपले हास्य हे चांगले दिसेल. नाहीतर या मोकळ्या जागा, हास्य करताना त्यातील काळपटपणा समोरच्याच्या नजरेस येतो. म्हणून दातांच्यामध्ये जागा नको.
दातांचे आणि हिरडय़ांचे रक्षण करा
दात आणि हिरडय़ांचे योग्यप्रकारे रक्षण करा. त्यातील भेगा भरून काढा. तुकडे असतील किंवा निघून गेलेले दात पुन्हा भरून काढा. त्यासाठी दंतवैद्याकडून नियमितपणे उपचार घ्या.
निघालेले दात परत बसवा
आपले दात निघाले असतील, तर त्याच्याशिवाय केलेले हास्य अत्यंत वाईट दिसते. अशावेळी निष्काळजीपणा न करता, हे निघालेले दात बसवून घ्या. हास्य करताना कुणाचेही आपल्या दातांकडे लक्ष जाते. अशा वेळी हे हास्य अत्यंत खराब दिसते. म्हणून चुकलेले किंवा निघालेले दात परत बसवून घ्या.
दात पांढरेशुभ्र करा
तंबाखू किंवा तत्सम पदार्थ चघळल्यामुळे तसेच वाढत्या वयोमानानुसार अनुवांशिकतेमुळे ते डागाळलेले दिसू लागतात. दातांचा रंग जाण्यामागची कारणं म्हणजे धुम्रपान, अति प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे हे आहे. अशावेळी दात स्ट्रिपच्या मदतीने किंवा लेझर उपचाराच्या पद्धतीने पांढरे शुभ्र करून घ्या. त्यामुळे आपले हास्य अधिक चांगले व शुभ्र दिसण्यास मदत होईल.
फळं आणि भाज्या खा
संतुलितआहाराबरोबरच फळं आणि भाज्या खा. त्यामुळे दातांची झीज कमी होते, तसेच मौखिक आरोग्य चांगले राहते. अधिक प्रमाणात फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात मिळते. त्यात लोह आणि कॅल्शिअमचे अधिक प्रमाण असते. अतिरिक्त शर्करादेखील टाळली जाते. त्यामुळे फळं आणि भाज्या यातील योग्यप्रमाणात जल तसेच अन्य घटक हे दातांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर जिवाणूंचीदेखील वाढ रोखते.
दातांना सुरक्षित ठेवा
दातांची नियमित तपासणी, निघालेले दात बसवणे, दातांचे तसेच हिरडय़ांचे दुखणे याच्यावर तत्काळ उपाय करा. हे आपले मौखिक आरोग्य योग्यप्रकारे ठेवण्यास उपयोगी पडते. त्याचबरोबर दातांची झीज रोखण्यासाठी नियमितपणे ब्रश करत जा.
फ्लॉसिंग
योग्य प्रकारे फ्लॉसिंग करून दातांमध्ये अडकलेले अन्नकण तसेच पदार्थ निघून जातात. अनेकदा टूथब्रश काही ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशावेळी फ्लॉसिंग हा चांगला उपाय आहे. त्यामुळे दात व हिरडय़ांचे आरोग्य योग्य राहते. दातांची झीज, हिरडय़ांचे आजार हे दररोज फ्लॉसिंग केल्यामुळे टाळता येते. म्हणूनच दररोज फ्लॉसिंग करणे आवश्यक आहे.
आरोग्यदायी पदार्थ खा
अधिक शर्करा किंवा कॅलरी असलेले पदार्थ दातांची झीज वाढवू शकतात. त्यामुळे त्यांना टाळले पाहिजे तसेच दररोज दातांना ब्रश करणे, गुळण्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे दातांची रचना कायम राहते तसेच कुठलाही त्रास होत नाही आणि आपले हास्य सुधारते.
कार्बन डायऑक्साइड असलेले पेय टाळा
कार्बन डायऑक्साइड असलेले पेय किंवा डाएट ड्रिंक यामध्ये आम्लाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दातांची झीज होते. परिणामी दातांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. ते अधिक कमजोर होतात. त्यांची झीज होते. याचा परिणाम आपल्या स्मितहास्यावर होतो.
तंबाखू तसेच धूम्रपान नको
सिगारेट, तंबाखू तसेच धूम्रपानामुळे मौखिक कर्करोगाचा धोका असतो. ते टाळण्यासाठी त्यांचे सेवन करू नये. त्याच्यामुळे दातांचा रंगदेखील बदलतो तसेच श्वसनाचा वासदेखील खराब येतो.
शर्करारहित च्युईंगम वापरा
शर्करारहित च्युईंगमचा उपयोग करा. त्यामुळे दातांवरील जीवाणू तसेच जंतू नष्ट होतात तसेच त्यांची झीजदेखील रोखण्यास मदत होते. तोंडाला व्यायाम मिळतो तसेच आपले हास्य कायम राहते.
जेवणाच्या मधल्या वेळेत खाऊ नका
आपल्या ठरलेल्या जेवणाच्या ज्या वेळा आहेत, त्यांच्यामध्ये काही खाऊ नका. कारण जेवण झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकवेळी ब्रश करायला हवा. ही सवय नियिमित ठेवा. त्यामुळे दातांना कुठलीही हानी पोहोचत नाही व आपल्या चेह-यावरील हसू कायम राहते.
जिभेला ही ब्रश करा
अनेकदा आपल्या दातांचा वास येण्यामागे जिभेचे ही महत्त्वाचे कारण असू शकते. त्याच्यावर जिवाणूंचा थर असतो. त्यामुळे त्याची तपासणीदेखील केली गेली पाहिजे. ही सवय ठेवली तर मौखिक आरोग्यही चांगले राहते तसेच मौखिक संसर्ग किंवा जिवाणूंचा प्रादुर्भावदेखील रोखला जाऊ शकतो.
मौखिक आजार दूर करा
मौखिक आजार जसे की दुखणे, सुजणे, संसर्ग, मोठय़ा प्रमाणावर लाळ, हिरडय़ांमधील जखमा यामुळे आपल्या हास्यावर परिणाम होतो. हे टाळले पाहिजे व योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.
मधुमेहाची तपासणी करा
जर तुम्हाला मधुमेह असेल तर मौखिक आरोग्याची समस्या मोठय़ाप्रमाणावर होऊ शकते. त्यामुळे शर्करा नियंत्रणात असायला हवी. त्यामुळे आपल्या दातांवरील हास्यदेखील कायम ठेवण्यास आपल्याला फार मोठी मदत मिळू शकेल.
चांगली झोप घ्या
चांगली झोप घेतल्यामुळे आपले शरीर व मन शांत राहते. नैसर्गिकरीत्या आपण ताजेतवाने होतो आणि आपल्या चेह-यावर हास्य उमटते.