स्वाईन फ्लूसह डेंग्यूचे डोके वर

पुणे – संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शहरात स्वाईन फ्लूसह डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुणियाने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या स्वाईन फ्लूचे दिवसाआड एक रुग्ण सापडत असून सद्यस्थितीत तीन रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कडक उन्हाळ्यामुळे मागील दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लू गायब झाला होता. मात्र, हवामानातील बदलामुळे पुन्हा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज 70 ते 80 संशयीत रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, सध्या शहरातील विविध रुग्णालयांत अतिदक्षता विभागात 3 रुग्णांवर, तर एकावर वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. 1 जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत 5 लाख 72 हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 153 रुग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे दिसून आले. तर 7 हजार 89 संशयितांना “टॅमीफ्लू’ देऊन विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. गुरुवारी (दि. 1) दिवसभरात 4 हजार 434 व्यक्‍तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 रुग्ण स्वाईन फ्लूचा आढळून आला. तर 15 जणांना टॅमीफ्लू देऊन घरी सोडण्यात आले.

डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला
शहरात डेंग्यूचे रुग्णही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साठलेली ठिकाणे नाहीसे करावे. डेंग्यूमध्ये जास्त ताप येणे, शरीरात वेदना होणे, अशक्‍तपाणा, डोकेदुखी असल्यास तत्काळ उपचार घ्यावे, असे आवाहन डॉ. तुषार पारीख यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.