युवक कॉंग्रेसची पिंपरीत निदर्शने

उन्नावच्या घटनेचा निषेध : भाजप आमदाराच्या अटकेची मागणी
पिंपरी – शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश मधील उन्नावच्या पीडित युवतीवर झालेल्या अन्यायकारक घटनांचा निषेध करण्यात आला. तसेच भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर व अन्य आरोपींवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात झालेल्या निषेध सभेला प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सचिव व पिंपरी चिचंवड युवक कॉंग्रेसच्या प्रभारी प्रिया पवार, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, अल्पसंख्यांक विभागाचे सचिव राजन नायर, प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, एनएसयूआयचे माजी अध्यक्ष सचिन कोंढरे, अशोक काळभोर, उमेश बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे आदी उपस्थित होते.

नरेंद्र बनसोडे म्हणाले, “”उत्तर प्रदेश मधील उन्नाव येथील बलात्कार व खून प्रकरण अमानवीय व विकृत मनोवृत्तीचे लक्षण असून जनतेनध्ये चीड व संतापाचे वातावरण आहे, अत्याचारासाठी सत्तेचा गैरवापर हे भाजपा राजवटीचे सूत्र आहे. या बाबत भाजप;व/श वरिष्ठ नेत्यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन हे भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्या या कृत्याला मूक संमती दिल्याचेच प्रतीक आहे. यातून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. आता सहनशीलतेचा अंत झाल्याने जनता भाजपला घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही”, असे बनसोडे म्हणाले. यावेळी सचिन कोंढरे, अशोक काळभोर, प्रिया पवार, अशोक मोरे यांनी भाजप सरकारचा निषेध केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.