पीएमसी ठेवीदारांची आरबीआयपुढे निदर्शने

मुंबई – मुंबईतल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांनी आपल्या पैशाच्या मागणीसाठी आणि या बॅंकेतील घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज रिझर्व्ह बॅंकेपुढे जोरदार निदर्शने केली. आज दुपारी पावणेबाराच्या सुमाराला या बॅंकेचे ठेवीदार आरबीआयच्या मेन गेटपुढे जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आज या ठेवीदारांची निदर्शने होणार असल्याचे लक्षात घेऊन आरबीआयच्या मुख्य इमारतीपुढे मोठा पोलिस फौज फाटा तैनात ठेवण्यात आला होता. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढण्यावर सध्या निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या या ठेवीदारांना केवळ चाळीस हजार रूपयेच काढण्याची अनुमती देण्यात आली आहे.

अनेक ठेवीदारांनी आपली आयुष्याची कमाई तेथे ठेवीच्या स्वरूपात ठेवली आहे. तसेच राज्यातील अनेक सहकारी पत संस्थांनीही त्यांच्याकडील ठेवी या बॅंकेत ठेवल्याने सहकारी पत संस्थाही अडचणीत आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.