370 कलमाबाबत अमेरिकेतील साप्ताहिकात आक्षेपार्ह लेख
वॉशिंग्टन – अमेरिकेतील प्रथितयश साप्ताहिकामध्ये 370 कलमाबाबत आक्षेपार्ह लेख छापून आल्याच्या निषेधार्थ सुमारे 300 काश्मिरी पंडीतांनी वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. काश्मिरी पंडीतांच्या या निदर्शनांमध्ये भारतीय समुदाच्या अन्य संघटनाही सहभागी झाल्या. यावेळी 370 कलम रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे कापडी फलकही फडकावण्यात आले.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने 370 कलम रद्द करणारे विधेयक संसदेत मंजूर केले. त्याबरोबर जम्मू काश्मीरची दोन केंद्रशासित राज्यांमध्ये विभागणी करण्याचा ठरावही केंद्र सरकारने मंजूर करून घेतला. तेंव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
“वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये छापून आलेला लेख सपशेल खोट्या वृत्तावर आधारित आहे, असे निदर्शकांनी म्हटले आहे. यावेळी या साप्ताहिकाच्या संपादकांना निदर्शकांकडून निवेदन देण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधींना 370 कलम व्यवस्थित समजावून सांगितले जाईल, असेही काश्मिरी पंडीतांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
370 कलम रद्द करण्याच्या निषेधार्थ 3 सप्टेंबरला एक रॅली काढली गेली होती. त्यावेळी इंडिया हाऊसवऱ् अंडी अणि न्य वस्तू फेकण्यात आल्या होत्या. ब्रिटनमधील भारतीय राजदूत रुची घनश्याम यांनी या इंडिया हाऊसची स्वच्छता केली.