नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बेकारी वाढली – मायावती

लखनौ – निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार न झाल्यास महाआघाडीचाच विजय होईल. भाजपचे छोटे-मोठे चौकीदार काहीच करू शकणार नाहीत. अच्छे दिनचे आश्वासन देऊन मोदींनी लोकांची दिशाभूल करत सरकारी तिजोरी लुटली आहे. अर्धवट तयारीने नोटाबंदी आणि जीएसटी लागू केल्याने बेरोजगारी वाढली आहे. भाजपच्या सत्ताकाळात आरक्षण व्यवस्था कमकुवत झाल्याचा दावा बसपा नेत्या मायावतींनी केला आहे.

सीबीआय आणि ईडीचा वापर सरकार विरोधकांना कमकुवत करण्यासाठी करत आहे. रोज धाडी पडत आहेत. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपही पोकळ आश्वासने देत आहे. मोदी सरकारच्या काळात देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. कॉंग्रेस आणि भाजपच्या भ्रष्टाचारामुळे संरक्षण सज्जतेला फटका बसला आहे. चौकीदारीचे नाटक भाजपला वाचवू शकणार नसल्याचे मायावती म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.