पिंपरी, – चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणा-या मार्गादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर नव्याने पूल उभारण्याबाबतच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
चिंचवड येथील रेल्वे मार्गावर मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने वाहतुकीसाठी दोन समांतर रेल्वे पुल अस्तित्वात आहेत. चिंचवड स्टेशनवरुन चिंचवड गावाकडे जाणारे डाव्या बाजुकडील पुलाचे आयुर्मान संपले असल्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने या पुलाची पाहणी करण्यात आली होती. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार जुन्या पुलावर अवजड वाहनास प्रवेश बंदी करून (सर्व बसेसह) वाहतूक करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी असलेले जुने पाडून नव्याने पूल उभारण्याबाबत महापालिकेला भारतीय रेल्वे विभागाकडून सुचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने तज्ञांच्या मागर्दर्शनाखाली जुने पूल पाडून नव्याने पूल उभारणी करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
चिंचवड व पिंपरीतील पूल पाडण्याचे पत्र
शहरातील पिंपरी व चिंचवड येथे लोहमार्ग ओलांडण्यासाठी उबारलेल्या पुलांचे आयुर्मान संपले आहे. त्यामुले हे पुल पाडून टाकण्याबाबत रेल्वे प्रशासनाने महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. या पुलांवरून अवजड वाहनांची होणारी वाहतूक व नागरिकांच्या जिवीताचा विचार करता चिंचवड लोहमार्गावरील पुल पाडण्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता मिळाली आहे.