गुजरातमधील “तनिष्क’ शोरूमची तोडफोड

वादग्रस्त जाहिरातीबाबत व्यवस्थपकाकडून लिहून घेतला माफिनामा

अहमदाबाद – दागिन्यांमधील प्रसिद्ध ब्रॅण्ड असलेल्या “तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमची आज तोडफोड करण्यात आली. तसेच शोरूमच्या व्यवस्थापकाकडून जमावाने माफीनामा लिहून घेतला आहे. दरम्यान, “तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यानंतर “तनिष्क’ला जाहीरात मागे घ्यावी लागली होती.

ही जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील जनतेची माफी मागतो, असे मॅनेजरने त्या माफीनाम्यात म्हटले आहे. गुजरातच्या गांधीधाममधील “तनिष्क’च्या शोरूमवर हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अन्य मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे कौतुक केले. मात्र भाजप नेत्या कोटापल्ली गीता आणि यांनी त्यावर ट्‌विटरद्वारे टीका केली.

समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर काही दिवसांपासून कंपनीने ही जाहिरात समाज माध्यमांवरून मागे घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.