कराची – पाकिस्थानातील सादिकाबाद जिल्ह्यात भोग शरीफ गावात सिद्धिविनायक मंदिरात काही अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे येथील स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या घटनेचा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
You are free to go you temple? Watch this brazen attack on a temple in the broad daylight.
Another bad day for #Hindus as Ganesh #Temple in Bhong city of Rahimyar Khan was attacked by miscreants. The beasts daringly live telecast the attack on Facebook: https://t.co/uVq8UYBkQB pic.twitter.com/SzGrtIxEzk
— Kapil Dev (@KDSindhi) August 4, 2021
व्हायरल व्हिडियोमध्ये मंदिराच्या परिसरात काही अज्ञात व्यक्ती आले असून ते मंदिरात तोडफोड करत आहे. त्यांचा हातात लाठी-काठ्या दिसून येत आहे.
यादरम्यान ते मंदिरातील मुर्तींसह अन्य काही भागांचही नुकसान करताना दिसून येतआहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तसंच पोलीस या घटनेचा तपासही करत आहेत.
तत्पूर्वी, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांत एका धर्मांध मौलवीच्या नेतृत्वात हिंदू मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर पाकिस्तान सरकार आणि पोलिसांवर टीका सुरू झाल्यानंतर पोलिसांनी २६ जणांना अटक करण्यात आली होती.