वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये निदर्शकांनी माजी लष्कर प्रमुखांचा पुतळा पाडला. या घटनेची संभावना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कलंक अशा शब्दात केली आहे.
याबाबतचा एबीसी7 या वृत्तवाहिनी शुक्रवारी मध्यरात्री वृत्त प्रसारीत केले. त्यात शेकडो निदर्शकांनी अल्बर्ट पाईक यांचा पुतळा दोर लावून पाडला. त्यानंतर तो पेट्रोल टाकून पेटवून दिला. काळ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
या घटनेनंतर पुतळा पाडून तो पटवून देत असताना नुसते पहात बसणाऱ्या पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी तातडीने ट्विट करून व्यक्त केली.
वॉशिंग्टनचे महापौर म्युरीयल ब्राउसर आणि राष्ट्राध्यक्षांमध्ये आंदोलन शांत करण्यासाठी बळाचा वापर करण्यावरून मतभेद आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी लष्कर पाचारन करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळीही हे मतभेद उफाळुन आले होते. यापर्श्वभूमीवर शुक्रवारी अमेरिकेत शुक्रवारी देशव्यापी मोर्चे काढण्यात आले. देशभरात असणारी गुलामगिरीची मानसिकता नष्ट करण्याची मागणी होत आहे.
वॉशिंग्टनमध्ये यापूर्वी निदर्शक व्हाईट हाऊसच्या बाहेर जमा झाले होते. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये लपून बसावे लागले होते.