माळेगाव : प्रशासकीय कामकाजात अधिकाऱ्यांना पत्रकारांचे सहकार्य लाभल्यास उत्तम प्रकारे कामकाज होऊन लोकशाही बळकट करता येईल, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी व्यक्त केले. माळेगाव येथे बारामती तालुका मराठी पत्रकार संघ, आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, चिन्मय लॅबोरेटरी यांच्या वतीने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन बिरादार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बिरादार म्हणाले की, जगात आरोग्य हिच खरी संपत्ती आहे. आजच्या धावपळीच्या युगात पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. यावेळी मुख्याधिकारी बालाजी लोंढे, कल्याण पाचांगणे, विजय भोसले, चिंतामणी क्षीरसागर, अनिता तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ३० पत्रकारांची हिमोग्लोबिन, शुगर, बिपी व इतर तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, गणेश खरात, अनिता खरात, बाबू वाघमोडे, अजित आत्तार, अनिल मदने, अशोक खुडे, ज्ञानेश्वर सानप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष योगेश भोसले, सचिव संदीप आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष संभाजी काकडे, वर्षा चव्हाण, दादा लोणकर, संतोष भोसले, असिफ शेख, सुनील जाधव, भारत तुपे आदी पत्रकारांनी केले होते. योगेश भोसले यांनी प्रास्ताविक केले. चिंतामणी क्षीरसागर यांनी आभार मानले.