कर्जत – तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीपासून इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये 10 किलोमीटरच्या मर्यादेमध्ये विकासकामे करण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक रस्ते,उद्योग, खाणकाम आदी विकासकामे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत.
परिक्षेत्रातील 10 किमी निर्बंधाचे मोठे अंतर कमी करण्याची मागणी आ. रोहित पवार यांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर यांना निवेदन देऊन केली आहे.
वनविभागाच्या हद्दीतून ग्रामस्थांना रस्ते, वनपरीक्षेत्रातील गावांचे ग्रामविकास आराखडे, वनविभागाच्या विविध योजनांसाठी प्रलंबित निधी व नव्याने योजना राबविणे, पाणी वितरणाच्या तुकाई चारीच्या कामासाठी वन विभागाच्या हद्दीतील क्षेत्राचा प्रस्तावही लवकर मंजूर करण्याची मागणी आ. पवार यांनी केली.