वाघोलीतील समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे

कोट्यावधीचा कर जमा करून देखील विकास कामे रखडली ; सरपंच वसुंधरा उबाळे यांची माहिती

वाघोली (दत्तात्रय गायकवाड) – वाघोली तालुका हवेली या गावचा पुणे महानगर पालिकेत समावेश करून देखील विविध समस्या व  अनेक विकासकामे रखडली असून तातडीने या बाबत लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवण्यासाठीचे निवेदन वाघोली सरपंच वसुंधरा उबाळे  व इतर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वाघोलीतील विविध समस्या सोडवणे बाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी माजी सरपंच माणिकदादा सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच समीर भाडळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव, गणेश सातव पाटील, बाळासाहेब सातव पाटील, वाघोली सोसायटी असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले की, अपुरी विकास कामे – वाघोली ग्रामपंचायतीच्या कालावधीमध्ये जी कामे ई निविदा करुन चालु होते व जी अपुर्ण कामे आहेत ती समाजउपयोगी असुन ड्रेनेज, रस्ते,पाणीपुरवठा व बांधकाम होती ती एकुण 21 कामांची यादी मा. आयुक्त साहेब पुणे मनपा यांना दिलेली आहे.

डेनेज लाईन दुरुस्ती करणे-
बरीच ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्यामुळे पावसाचे पाणी घरामध्ये जात आहे. यावर सुध्दा मनपा कडुन दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असताना आज पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आले नाही.

दिवाबत्ती कामे- वाघोली ग्रामपंचायत मार्फत मोठ्या प्रमाणात पुणे नगर रोड व
गावामध्ये स्टिट लाईट व्यवस्था करण्यात आली होती परंतु सध्यस्थितीला गावातील
बरेच ठिकाणी दिवाबत्तीची कामे दुरुस्ती अभावी स्ट्रिट लाईट बंद आहेत.

पाणीपुरवठा व्यवस्था व भामा आसखेड चे पाणी मिळणेबाबत —
वाघोली नविन वाढीव पाणीपुरवठा योजना चे   योजनेसाठी ग्रामपंचायत  रक्कम खर्च  आपल्यामुळे माफ करण्यात आले. भामा-आसखेडचे पाणी वाघोलीगावासाठी मिळावे.

सिग्नल चालु करण्यात यावेत.—
ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली सिग्नल यंत्रणा कार्यरत होती. मात्र सध्या पुणे महानगरपालिकेत वाघोलीचा समावेश झाल्यानंतर सिग्नल यंत्रणा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असून पुणे महानगरपालिकेकडून  यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

उद्यान व्यवस्था-
वाघोली मध्ये ग्रामनिधी व लोक वर्गणीमधुन दोन उद्याने उभारण्यात
आली आहेत परंतु आजतागायत पुणे मनपाकडुन उद्यान दुरुस्ती करण्यात आली नाही.तसेच उद्यान चालु करण्यात आली नाहीत.

पुणे मनपा अधिकारी उपस्थितीबाबत- वाघोली संपर्क कार्यालयात आवश्यक अधिकारी वर्ग उपस्थित नसल्याकारणाने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच जन्म व मृत्यु
विभाग आजतागाय चालु करण्यात आला नाही.

ग्रामपंचायत कर्मचारी वेतनाबाबत- वाघोली व समावेश झालेल्या 23 गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे गेली चार महिन्यापासुन वेतन करण्यात आले नाही.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे  पगारावरच कुटुंबाचे उदरनिर्वाह  अवलंबून असल्यामुळे त्यांचे पगार लवकरात लवकर करण्यात यावे व कर्मचाऱ्याना दिवाळीचा बोनस देण्यात यावा.

पीएमआरडीए ने जाहिर केलेल्या विकास आराखड्याबाबत.- वाघोलीमध्ये विकास
आराखडा तयार करताना रस्ते व आरक्षण टाकताना शेतकऱ्याना विश्वासात घेणे आवश्यक होते. अनेक ठिकाणी एकाच गटामध्ये दोन दोन आरक्षण टाकण्यात आली
आहेत. तरी संबंधित गटाबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत पीएमआरडीए ला योग्य त्या सुचना व आदेश व्हावेत.

कचरा व्यवस्थापना करिता मंजुर जागा मिळण्याबाबत- वाघोली ग्रामपंचायत मार्फत गट नं. 1123,1362 व 1419 मध्ये जागा मागणी केली होती ती मा. विभागीय आयुक्त साहेब यांच्या मंजुरीने महाराष्ट्र शासनास सादर केली आहे तरी सबंधित जागा हस्तातरीत होण्यास सुचना व आदेश व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

“वाघोली मधील रस्ते, सांडपाणी, पिण्याचे पाणी, कर्मचारीवर्ग, उद्याने, वाहतूक यंत्रणा, याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.”
– रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य, वाघोली)

“शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा प्रशासन यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.”
– शिवदास उबाळे (माजी सरपंच, वाघोली)

अडचणींचा डोंगर पार करण्याची मागणी..
पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तथा ग्रामस्थ व सामाजिक संस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वाघोलीतील समस्या सोडवण्यासाठी मागणी केली आहे. 30 जून रोजी पुणे मनपा मध्ये समावेश झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेत जवळपास चार कोटी 50 लाख रुपयांचा मिळकत कर जमा करून देखील नागरिकांच्या समस्या अजून वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.