पिंपरी – कोविड- 19 चा संसर्ग वाढू नये यासाठी जनजागृती आणि दक्षता घेण्यासाठी आवाहन करणारी करोना कॉलर ट्यून आता वेळखावू व डोकेदुखीचा विषय बनत चालली आहे. ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी याबाबत असे म्हटले की, मार्च महिन्यापासून केंद्र सरकारने करोना जनजागृतीसाठी कॉलर ट्यून सुरू करण्याचे आदेश मोबाइल कंपन्यांना दिले, तेव्हापासून सुरू असलेली ही ट्यून मनस्ताप देणारी आणि चेष्टेचा विषय झाली आहे.
सलग एक मिनिट चालणाऱ्या या ट्यूनमुळे अनेकांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या कॉलर ट्यून त्वरित बंद कराव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.