सरकार, ‘रेमडेसिविर’चे भाव तातडीने कमी करा

करोना बाधित वाढताच औषधाची मागणी वाढली

पुणे  – शहरात मागील महिनाभरापासून करोना बाधितांसह गंभीर आणि ऑक्सिजन आवश्यक असणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यांचे प्राण वाचवण्यासाटी “रेमडेसिविर’ या इंजेक्शनची मागणीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. काही मोजक्याच कंपन्यांच्या या इंजेक्शनची किंमत 4 ते 5 हजार रुपयांदरम्यान असून रुग्णालयांकडून हे इंजेक्शन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान या इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

 

 

देशभरात करोनाचे बाधित वाढल्यानंतर गंभीर किंवा ऑक्सिजनवरील करोना बाधितांना “रेमडेसिविर’ तसेच “टोसिलीझूमॅब’ यांसारखे इंजेक्शन देवून संसर्गाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामध्ये काही प्रमाणात यशही आले, त्यामुळे या इंजेक्शनला मागणी मोठी मागणी होती.

 

 

ऑक्टोबर ते जानेवारी 2021 अखेरपर्यंत शहरात करोनाचा संसर्ग कमी झाला होता. परिणामी, “रेमडेसिविर’ची मागणीही घटली. आता संसर्गाची तीव्रता वाढली. रुग्णसंख्या वाढल्याने गंभीर तसेच ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत ही मागणी 10 टक्क्यांवर होती. आता त्यात पाच पटीने वाढ होऊन ही मागणी सुमारे 40 ते 50 टक्क्यांवर गेली आहे. सध्या बाजारात ज्युबिलंट, सिप्ला, हेट्रो आणि डॉ. रेड्डीज या चार कंपन्यांच्या इंजेक्शनची 4 ते 5 हजार रुपयांमध्ये किंमती आहेत, अशी माहिती श्लोक एंटरप्रायझेसचे संचालक निलेश अमृतकर यांनी दिली.

 

शहरात रुग्णालयांकडून “रेमडेसिविर’ची विक्री एमआरपीनुसार सुरू आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एमआरपीच्या दरात आता सरकारने नियंत्रण आणून त्याचे दर कमी करायला हवेत. सरकारने रुग्णाना परवडणारे दर जाहीर करावेत.

– अनिल बेलकर, सचिव, सीएपीडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.