नगर – सध्या सीताफळांचा हंगाम सूरु आहे. शहरातील सावेडी, चितळे रोड या परिसरातील बाजारामध्ये सीताफळ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळाची बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे सीताफळांचे दरही कमी आहेत.
पावसाळ्यात सुरू होणारा सीताफळांचा हंगाम आक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये संपतो. शेवटच्या टप्यात सीताफळांचा हंगाम मोठ्या प्रमाणत पहायला मिळतो. आताही बाजरात सिताफळांची आवक वाढत आहे. अगदी लहान मोठ्या सीताफळापासून सीताफळ बाजारात विक्रीस आले आहेत. मोठ्या आकाराचे एक सीताफळ 200 ते 300 ग्रॅम वजनाचे आहे. या सीताफळांचे दर क्वालिटीनुसार आहेत. मात्र, घाऊक बाजारात सीताफळ 40 रुपये किलो या दराने मिळत आहेत. सध्या बाजारात 40 रुपये किलोपासून ते 70 रुपये किलो पर्यंत सीताफळाचे दर आहेत.
यावर्षी सीताफळांच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याने अनेकांना सीताफळे चाखता येणार आहेत. यावर्षी हंगाम उशिराने सुरू झाला आहे त्यामुळे हंगाम लांबणार आहे. सीताफळ गोड आणि आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने सीताफळाला ग्राहकांकडून उत्तम मागणी आहे.