निवडणुकीचे काम देण्याची आश्रम शाळेतील शिक्षकांची मागणी 

नगर  – संगमनेर येथील शासकीय आश्रम शाळेला निवडणुकीचे काम मिळाले नाही म्हणून संबंधित शिक्षकांनी स्थानिक पातळीवर आम्हाला निवडणुकीचे काम मिळावे अशी लेखी मागणी येथील निवडणूक प्रशासनाला केली निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही ते करायला तयार आहोत असेही त्यांनी त्यात नमूद केले आहे.

दरम्यान एकीकडे निवडणुकीचे काम नको म्हणून अनेक जण काय काय करत असतात पण संगमनेरमधील आश्रम शाळेच्या शिक्षकांनी एक प्रकारचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे निवडणुकीचे काम करताना प्रशासकीय पातळीवर मतदान केंद्राच्या शिपायापासून पासून तर ऑब्झर्वर पर्यंत नेमणूक करण्याची पद्धत आहे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार ही कामे केली जातात.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी नगरच्या प्रशासनाने संबंधित निवडणुकीसाठी कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून नेमणुका करण्याचे आदेश दिले होते यामध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा सुद्धा समावेश होता तसेच जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या हि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या शिक्षकांमध्ये एचडी गुळवे एस जी पवार पी जे वाकचौरे, एस बी कावरे वैद्य श्रीमती वैद्य जठार सानप व शिपाई बी एन लवांडे यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.