जनसुनावणी घेण्याची मागणी

पुणे –“एचसीएमटीआर’ निर्मिती विषयी असलेले आक्षेप “एचसीएमटीआर’ नागरिक कृती समितीने पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे नोंदविले आहेत. हा वर्तुळाकार मार्ग 1983 च्या आराखड्यात फक्‍त सार्वजनिक वाहतुकीसाठी असताना तो त्या काळात शहराच्या वेशीवर बांधण्याचा विचार होता.

1983 पासून शहररचना खूप बदलली असून 2019 सालात हा प्रोजेक्‍टचा मार्ग आता शहराच्या मध्यवर्ती, दाट वस्तीतून जाणार असून तो आजच्या परिस्थितीला किती उपयोगाचा ठरेल हा प्रश्‍न उद्‌भवला आहे. या प्रोजेक्‍टमध्ये बदल करून 4 मार्गिका या खासगी वाहनांसाठी ठेवण्याचे आणि फक्‍त 2 मार्गिका बीआरटीसाठी करण्याचे टेंडर निघाले आहे.

मुळात साडेआठ हजार कोटी खर्चाच्या या मोठ्या प्रकल्पाला जनसुनावणी न घेता असा अचानक बदल योग्य नाही, असे कृती समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी डॉ सुषमा दाते, सत्या नटराजन, कनिझ सुखरानी, पी. के. आनंद, राजीव सावंत, हेमा चारी, सुवर्णा आखेगावकर, मयुरेश मांडके, रमेश नारायणी, भूपेश शर्मा, पुष्कर कुलकर्णी हे विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)