पुणे – विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सायकल पासून फ्लोट ट्रकपर्यंत वाहनांचा वापर होत आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी ओपन जिप्सी, ओपन ट्रक, सनरुफ असलेली वाहने वापरली जात आहेत. जिप्सीला अधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे.
एकूण वाहन परवान्यामध्ये २६२ वाहनांना स्पीकरसह परवाना देण्यात आला आहे. तर, एलईडी असलेल्या वाहनांचा देखील वापर वाढत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत एलईडी असलेल्या १७ वाहनांनी परवानगी घेतली आहे. त्यामध्ये आंबेगाव व पुरंदर मतदार संघाचा समावेश आहे. पण, दुसरीकडे प्रचार साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवाना घेतला नसल्याचे दिसून आले आहे. काही मतदारसंघात निवडणूक साहित्याची वाहतूक करण्यासाठी अर्ज आले होते.
पण, कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे ते नामंजुर करण्यात आले आहेत. दरम्यान, मतदारसंघात एलईडी मोठ्या प्रमाणात लावल्याचे दिसून येते. मात्र, परवानगी मिळालेल्याच्या तुलनेत एसईडी स्क्रीनची संख्या अधिक आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी घ्यावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.