लिंबाला मागणी घटली

हिरवा माल अधिक प्रमाणात बाजारात दाखल होत असल्याने परिणाम

पुणे – मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे कलिंगड आणि मोसंबी वगळता सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आवक घटल्याने कलिंगडाच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे 5 रुपयांनी घट झाली.

तर, मोसंबीच्या भावात किंचित घट झाली. लिंबाचा नवीन बार सुरू झाला आहे. त्यामुळे हिरवे लिंबु अधिक प्रमाणात बाजारात येत आहे. त्यामुळे लिंबाला नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे.

डाळिंबाला विक्रमी भाव

मार्केट यार्डात उरळी कांचनजवळील टिळेकरवाडी येथील शेतकरी बाळासाहेब टिळेकर यांच्या डाळींबाला किलोला 501 रुपये भाव मिळाला. गेल्या रविवारीही डाळिंबाला किलोला 401 रुपये भाव मिळाला होता. याबद्दल टिळेकर यांनी आनंद व्यक्‍त केला.

ते म्हणाले, गेल्या 15 दिवसांपासून डाळींब विक्रीसाठी पाठवत आहे. गेल्या आठवड्यात आणि आताही डाळींबाला जास्त भाव मिळाल्याचा आनंद होत आहे. तीन एकर शेतामध्ये दीड हजार झाडे असून, मागील पाच वर्षांपासून उत्पादन घेत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.