पेयजल योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी

जिल्हा परिषदेसमोर आंदोलन : संबंधितांवर कारवाई करा
नगर – नगर तालुक्‍यातील नांदगाव येथे पेयजल योजनेचे काम झाले आहे. या योजनेअंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून, या कामाची चौकशी अद्याप झाली नाही.

या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा मागणी समाजसेवक रावसाहेब वर्षे, लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहिदास उमाप यांनी आंदोलनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषदे समोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. नांदगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत (2012-2013) विविध कामांसाठी 50 लाखांचा निधी शासनाकडून देण्यात आला. मात्र संबंधितांनी हलक्‍या दर्जाचे साहित्य वापरून गैरव्यवहार केला आहे.

पेयजल योजनेचे झालेले काम निकृष्ट झाले असून, लोखंडी पाईप ऐवजी अनेक ठिकाणी पीव्हीसी पाईप टाकण्यात आले आहेत. या कामाची चौकशी करावी व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.
गावातील विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. या योजनेमध्ये अधिकारी, ठेकेदार आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायती मधून शासनाचा निधी स्वतःच्या पदरी बाळगला आहे. यामुळे कामाची गुणवत्ता देखील कमी प्रतीची आहे. यासंदर्भात कामाची चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.