वाघोली (प्रतिनिधी) : हवेली तालुक्यातील लोणीकंद-थेऊर रस्त्यावर थेऊर फाटा ते थेऊर गाव रस्त्याची दुर्दशा झाल्याने हवेली तालुका भाजपच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दोन दिवसापूर्वी एक व्यक्ती अपघाताने दगावली असून रोज होणारे अपघात अगनिक आहेत याविषयी भाजपा हवेली तालुक्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे हवेली तालुका भाजप अध्यक्ष सुनील कांचन यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले व या प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जर रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.
याप्रसंगी हवेली तालुका अध्यक्ष सुनील पाटील कांचन, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य गणेश बापू कुटे, पुणे जिल्हा सचिव पुनम चौधरी, तालुका सरचिटणीस गणेश चौधरी,प्रदीप सातवआदी उपस्थित होते.