आर्थिक विकास आणि उर्जेची मागणी – साथ साथ! (भाग-३)

आर्थिक विकास आणि उर्जेची मागणी – साथ साथ! (भाग-१)

आर्थिक विकास आणि उर्जेची मागणी – साथ साथ! (भाग-२)

जरी आता कच्च्या तेलाच्या किमती चढ्या असतील व त्यामुळं आपल्या तेल मार्केटिंग कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असेल तरी निवडणुकीनंतर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढवल्या जाऊन त्या कंपन्या आपला तोटा कमी करू शकतील, त्यामुळं नकारात्मक वातावरणात सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओला ऊर्जा ही मिळणारच..

जसजशी निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येत चाललीय, प्रत्येकानं बाजाराबद्दल काहीतरी आडाखे नक्कीच बांधले असतील. शेवटचं मतदान हे १९ मे म्हणजे रविवारी होईल व लगेचच एक्झिट पोल आपले अंदाज सांगायला सुरु करतील आणि त्याजबरोबरीनं बाजार आपले रंग दाखवेल. या महिन्यातील शेवटचे दोन आठवडे (२३ मे व ३० मे ची मुदत समाप्ती) हे बाजारातील ट्रेडर्ससाठी पर्वणी असणार आहे, म्हणजे कमी नुकसान पण मिळालं तर घबाड, अगदी लॉटरीच्या तिकिटासारखं.  कॉल किंवा पुट ऑप्शन खरेदी घेणं म्हणजे वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून वेगवेगळ्या भावातील लॉटरीचं तिकीट घेणं, यापैकी बाजारानं जोरदार उसळी मारली किंवा बाजार कोलमडला तर मिळणारा नफा हा मोजलेल्या किमतीपेक्षा बराच जास्त असू शकतो. याविषयी पुढील लेखात. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार खाली राहून सुद्धा निफ्टीच्या जवळजवळ सर्वच कॉल ऑप्शन्समध्ये तेजी दिसून आली, सहसा अशी गोष्ट घडत नाही, याचा अर्थ बाजारात अनेक लोक तेजी गृहीत धरून व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या १२५००, १२००० व १३००० या स्ट्राईक प्राईसच्या कॉल ऑप्शन्समध्ये सर्वांत जास्त पोझिशन्स घेतल्या गेलेल्या आहेत तर उलट बाजूस अनुक्रमे, ११०००, ११५०० व १०५०० या पुट ऑप्शन्समध्ये सर्वांत जास्त पोझिशन्स घेतल्या गेलेल्या आहेत. यांपैकी १२५०० चा कॉल ऑप्शन व ११००० चा पुट ऑप्शन घेणं किंवा काठावर बसून वाट पाहणं हेच काय ते सोयीस्कर दिसतंय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.