आर्थिक विकास आणि उर्जेची मागणी – साथ साथ! (भाग-२)

आर्थिक विकास आणि उर्जेची मागणी – साथ साथ! (भाग-१)

भारत हा जगातील सर्वांत मोठा ऊर्जा उपभोक्ता देश आहे. भारताची प्राथमिक ऊर्जा मागणी ही २०३५ पर्यंत १५१६ दशलक्ष टन तेल इतकी वाढण्याच्या अपेक्षा वर्तवल्या गेल्या आहेत. भारताचा तेल उपभोग्य देशांपैकी पहिल्या तीन देशांमध्ये नंबर लागतो,  तर एलएनजीच्या आयातीत जगात चौथा. आजतागायत भारतातील गॅस पाईपलाईनचं जाळं हे १६२२६ कि.मी.चं आहे. तेल व वायू क्षेत्रात, समन्वेषण व उत्पादन (एक्सप्लोरेशन व प्रॉडक्शन) प्रक्रिया ही, इ.स. २०२२ पर्यंत २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करेल असा अंदाज आहे. इ.स. २०२२ पर्यंत भारताची तेल आयात आताच्या आकडेवारीच्या १० टक्क्यांहून कमी करेल त्यामुळं देशांतर्गंत उपक्रम राबवण्यासाठी सुमारे ३०० अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे असा अंदाज वर्तवला जातोय तर स्थानिक ओएनजीसी कंपनी, भारतात १७६०० कोटी रुपये तेल व वायू विहिरी खोदण्यासाठी गुंतवणूक करत आहे.

ऊर्जेच्या क्षेत्रात रिन्यूएबल एनर्जी प्रकारात बायो-गॅस देखील प्रभावी ठरत आहे. बायो टेक कंपन्या ज्या औद्योगिक एन्झाईम नावाचं द्रव्य अप्रत्यक्षपणे उत्पादित करत असतात त्या आता सेल्युलोसिक एन्झाईम बनवू लागल्या आहेत ज्यामुळं बायो-इंधन बनवण्यासाठी मदत होत आहे. (लाभार्थी कंपन्या :ॲडव्हान्सएन्झाईम, नागार्जुना फर्टिलायझर्स, इ.)

आर्थिक विकास आणि उर्जेची मागणी – साथ साथ! (भाग-३)

आज आपण पाहतोच आहोत की उन्हाळ्यातील सरासरी तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे ज्यामुळं आधी चैनीचा वाटणारं वातानुकूलित यंत्र आता गरजेचं भासू लागलंय. तसंच, सन २०३० पर्यंत प्रत्येक चारचाकी गाडी ही इलेक्ट्रिक असेल असं सूतोवाच खुद्द भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानं सर्वांचे लक्ष वीज क्षेत्रावर लागून त्याजबरोबरीनं बॅटरी, ट्रान्समिशन, डिस्ट्रिब्युशन यांवर देखील केंद्रित झालंय. त्यामुळं विजेची मागणी वाढणार हे नक्की परंतु पुरवठा मर्यादित असल्यानं सौर व पवन ऊर्जा देखील महत्वाची ठरणार आहे. हीच मागणी सन २०२२ पर्यंत १८९४ टेरावॉट तास होईल असा अंदाज आहे. त्यापैकी रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातून १७५ गेगा वॉट मागणी पूर्ण करण्याची यंत्रणा उभारली जाईल असा अंदाज सरकारनं वर्तवला आहे ज्यामध्ये ११० गेगा वॉट सौर ऊर्जा तर ६० गेगा वॉट पवनऊर्जा,  बायो अथवा हायड्रो पॉवरद्वारे अपेक्षित आहे. भारतातील कोळशावर आधारित वीज निर्मिती क्षमता सध्या १९१ गेगा वॉट आहे, जी सन २०४० पर्यंत ३३०-४४१ गेगा वॉट पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडं,सन २०१९ च्या शेवटास सर्व प्रकाश गरजांसाठी एलईडी वापरणारा भारत हा जगातील पहिला देश असू शकेल. त्यामुळं तेल, जैवइंधन, ऊर्जा, वीज निर्मिती, पारेषण व वितरण (Generation, Transmission &Distribution), इ. संबंधीत उत्पादनंतारा, केबल, बॅटरी,इतर उत्पादनं व आनुषंगिक उत्पादनं यासंबंधीत योग्य कंपन्यांमध्ये योग्य वेळेस केलेली दीर्घ कालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. (लाभार्थी कंपन्या : ऑईल इंडिया, एनटीपीसी, एसजेव्हीएन, टाटापॉवर, सुझलॉन, अदानी पॉवर, एनएलसी, जीइ टी &डी, पॉवरग्रिड, एक्साइड, इ.) रिलायन्स इंडस्ट्रीज ही उर्जा क्षेत्रातील प्रमुख कंपनी. ती करत असलेल्या विशेष गुंतवणुकीविषयी आपण स्वतंत्रपणे माहिती घेणार आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.