‘कौन बनेगा करोडपती’वर बहिष्कार टाकण्याची मागणी

ट्विटरवर #Boycott_KBC_SonyTv ट्रेण्ड

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे प्रकरण केबीसी प्रसारित करणाऱ्या सोनी वाहिनीबरोबरच अभिनेते अमिताभ बच्चन यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहे. ट्विटवर शुक्रवार सकाळपासूनच अनेकांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोनी वाहिनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. अनेकांनी हा हिंदू राजाचा अपमान सहन केला जाणार नाही असे म्हटले आहे. #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग भारतामध्ये ट्विटवर नवव्या क्रमांकाला ट्रेण्ड होत होता. 9 हजारहून अधिक जणांनी हा हॅशटॅग वापरून ट्विट केले आहे.

गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर असताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले. यामध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. यावरुनच अनेकांनी सोनी वाहिनी, मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध अनेकांनी ट्विटवरुन राग व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन अमिताभ बच्चन, सोनी वाहिनी, मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्थानकामध्ये यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने अर्जही दिल्याचे समजते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.