मंचर – अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. बिबट्याने शेतकऱ्यांचे पशुधन, शेळी, कुत्री, मेंढपाळाच्या मेंढ्या आणि घोड्यावर ताव मारुन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वनविभागाने बिबट्याच्या उपद्रवापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवसरी, निरगुडसर, पारगाव, मेंगडेवाडी, गावडेवाडी परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हिंगेवस्ती, शेटे-गुणगेमळा, वरचा हिंगेमळा परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.