विराट कोहलीच्या अटकेची मागणी

जुगाराच्या अ‍ॅपची जाहिरातबाजी भोवणार

नवी दिल्ली – जुगाराच्या अ‍ॅपची जाहिरात केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या अटकेची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडविणारी ही घटना असून यावर आता सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

करोनाच्या धोक्‍यामुळे सध्या सर्वांनाच घरात राहावे लागत आहे. त्यातच खेळाडूदेखील घरातच असूनही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. याच माध्यमावर पोस्ट केल्यावर करोडो रुपये कमावणारा कोहली सध्या देशात कमाईच्या बाबतीत अग्रेसर आहे. मात्र, आता त्याची हीच कृती त्याच्या (पान 2 पहा)8

अंगलट येण्याची शक्‍यता आहे. चेन्नईतील एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात कोहलीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. कोहली सोशल मीडियावर एका जुगाराच्या अ‍ॅपची जाहिरात करत असून त्यामुळे देशातील नागरिकांना जुगाराचे व्यसन लागण्याची शक्‍यता आहे. कोहली एक पब्लिक फिगर असून त्याचे अनुकरण केल्याने देशाची युवा पिढी बरबाद होण्याचाही धोका आहे. कोहलीच्या आवाहनामुळे सध्या देशात अनेक जण या अ‍ॅपच्या व्यसनाने ग्रासले आहेत. कोहली ज्या ऑनलाईन जुगाराच्या अ‍ॅपची जाहिरात करत आहे. त्यातून एका युवकाने आत्महत्याही केली आहे.

कोहलीमुळेच युवा पीढीमध्ये या जुगाराचे व्यसन वाढत आहे. आणखी किती जणांचा जीव धोक्‍यात घालणार हा प्रश्‍न आहे. कोहली ही जाहिरात करून जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे या अ‍ॅपवर बंदी लावण्यात यावी व लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी कोहलीला अटक करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली असून येत्या मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.