देहूरोड – देहूरोड हद्दीतील महामार्गावर वाहन चालकांकडून वाहनांच्या नियमांचे सर्रास उल्लंघन प्रमाणात होत आहे. अशा वाहनांवर वाहतूक नियंत्रक विभागाच्या पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
वाहतुकीसाठी वाहनांसाठी असलेल्या मर्यादा क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या (ओव्हर लोड) गौण खनिजासह इतर माल वाहतूक करणाऱ्या हायवा, डम्पर, ट्रक टेम्पो महामार्गावरून ये-जा करीत असतात.
रस्त्यांवर सेवा रस्त्यांवर हॉटेल, ढाबे, बार रेस्टॉरंट, गॅरेज, दुकानांसमोर तसेच महामार्गावरील फळविक्री तर समोर रस्त्यांवरच उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
मेन बाजारपेठेसह परिसरात कालबाह्य झालेल्या (स्क्रॅप), विना परवाना, गणवेश, बॅच नसलेले रिक्षा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहेत. बाजार पेठतील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात होत आहे.