आपची केंद्राकडे व्हीजन डॉक्‍युमेंटची मागणी

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाने केंद्राकडे वन नेशन वन इलेक्‍शनच्या बाबतीत व्हिजन डॉक्‍युमेंटची मागणी केली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानांनी आज या विषयावर बोलावलेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्या ऐवजी त्यांनी आपले प्रतिनिधी राजीव चढ्ढा यांना तिकडे पाठवले होते. चढ्ढा यांनी यावेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना एक निवेदन सादर करून सरकारने या प्रस्तावामागची नेमकी कल्पना आणि योजना स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. जो पर्यंत सरकारची नेमकी योजना आम्हाला समजणार नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला त्याविषयीचे आपले मत नेमकेपणाने मांडणे शक्‍य होंणार नाही असे आपने या निवेदनात म्हटले आहे.

मुळात देशात एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवता येणे अनेक अर्थाने अशक्‍य आहे आणि आपल्या बहुविध लोकशाहीसाठी ही संकल्पना घातक आहे असेही या पक्षाने म्हटले आहे. एखाद्या राज्यात एखाद्या सरकारचे बहुमत गमावले गेले आणि ती विधानसभा बरखास्त करण्याची वेळ आली तर त्या राज्यातील लोकांनी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रपती राजवटीत दिवस काढायचे काय? असा प्रश्‍नही या पक्षाने उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.