महामार्गालगतच्या रस्त्यावर गतिरोधक उभारण्याची मागणी

कराड – पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या कराड येथील पंकज हॉटेल समोरुन कराड शहरात येणाऱ्या मार्गावर गतिरोधक नसल्याने बोगद्यातून महामार्गावर निघणाऱ्या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यासाठी याठिकाणी संबंधितांनी तत्काळ गतिरोधक उभारावेत, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांमधून होत आहे.

कोल्हापूर नाका परिसरात महामार्गावरून वेगाने वाहने शहरात येत असतात. याच वेळी बोगद्यातील मार्गातूनही शहरातून वाहने महामार्गाकडे सुसाट जात असतात. यामुळे याठिकाणी अनेकदा वाहनधारकांना लहान-मोठे अपघात होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागत असते. तसेच याठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यास सातत्याने वाहने पुढे नेण्यावरूनही वादावादीचे प्रकार होत असतात. यासाठी बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन याठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक उभारावा, अशीही मागणी प्रवासी तसेच नागरिकांमधून होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×