मुंबईतील चाचण्यांमध्ये डेल्टा प्लसच्या रूग्णाची नोंद नाही

मुंबई – मुंबई महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात एकूण 376 रूग्णांच्या चाचण्या घेतल्या. तथापि त्यांच्यापैकी कोणालाही कोविडच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेली नाही असे स्पष्ट झाले आहे. अतिरीक्त महापालिका आयुक्त सुरेश ककनी यांनी ही माहिती दिली.

शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या जिनॉम सिक्वेन्सींग प्रयोगशाळेत हे नमूने तपासण्यात आले असे त्यांनी सांगितले. या 376 रूग्णांपैकी 304 रूग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचे दिसून आले आहे. पण डेल्टा प्लस विषाणुचा एकही रूग्ण अजून पर्यंत आढळून आलेला नाही.

दोन रूग्णांमध्ये 19 ए, आणि 20 ए जातीचे विषाणू आढळून आले आहेत. तर उर्वरीत 66 रूग्ण कोविड 19 चे नियमीत रूग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात 188 जणांचे जिनॉम सिक्वेसिंग करण्यात आले होते. त्यावेळी त्यात 138 जणांमध्ये डेल्टा आणि उर्वरीत रूग्णांमध्ये कोविड 19 चे विषाणु आढळून आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.