दहा दिवसांत 24 वाहनांचे ग्राहकांना वितरण

नगर – अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या एमआयडीसी येथील यशवंत फोर्ड शोरुममध्ये ग्राहकांची गर्दी झाली आहे. उद्‌घाटनानंतर अवघ्या दहाच दिवसांत तब्बल 24 वाहनांचे वितरण झाले असून, आता दसऱ्याचा मुहुर्त साधण्यासाठी बुकींग सुरु असल्याचे यशवंत फोर्डचे संचालक धनंजय गाडे पाटील यांनी सांगितले.

फोर्ड कंपनीने उत्पादीत केलेली सर्वच वाहने ग्राहकांसाठी येथे उपलब्ध आहेत. तसेच विक्री पश्‍चात सेवा अत्यंत चांगली असल्याने ग्राहकांना ओढाही यशवंत फोर्ड शोरुमकडेच असल्याचे गाडे पाटील म्हणाले. नवीन शोरुम उद्‌घाटनानिमित्त फोर्डच्या सर्वच ग्राहकांना लेबर सर्व्हीसमध्ये 20 टक्के भरघोस सूट देण्यात आली आहे. त्याचाही फायदा अनेक ग्राहकांनी घेतला. तसेच त्या सेवेबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

फोर्ड कंपनीची एंडेव्हर, इकोस्पोर्टस, एस्पायर, फ्रिस्टाईल, फिगो आदी वाहने तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या सर्वच वाहनांमध्ये कंपनीने आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सात एअरबॅगा, सनरुफ, टीसीएस, एआरपी, ब्ल्यू लिंक, टच स्क्रीन, नेव्हीगेशन, बटन स्टार्ट, हाय ग्राऊंड क्‍लिअरन्स, अग्रेसिव्ह लूक, अशी विविध प्रकारची फिचर्स या वाहनांमध्ये आहेत. त्याचा चालक व प्रवाश्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील खूप चांगला फायदा असल्याचे गाडे पाटील म्हणाले.

त्याशिवाय फोर्ड कंपनीची सर्वच वाहने आता डिझेल व पेट्रोल इंधनात देखील उपलब्ध आहेत. तसेच यशवंत फोर्ड शोरुमधील कर्मचारी वर्ग अत्यंत कौशल्यप्राप्त व अनुभवी आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वाहनांची सर्व्हीसिंग अत्यंत समाधानकारक मिळत असल्याचा अभिप्राय देखील ग्राहकांनी दिल्याचे सेल्स मॅनेजर सुशील ओस्तवाल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.