मुंबईत डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण; शिवसेना शाखाप्रमुखासह चौघांना अटक

मुंबई – मुंबई शहरात डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत डिलिव्हरी बॉयला जखमी झाला आहे. शहरातील कांदिवली भागात हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

राहुल शर्मा असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो एका ई कॉमर्स साईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून कामास आहे. राहुल कांदिवली पूर्व विभागात रहावयास असून तो पोईसर परिसरात डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्याने पोईसर शिवाजी मैदान परिसरात असलेल्या शिवसेना शाखे जवळ आसरा घेतला.

राहुल थांबलेल्या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता चंद्रकांत निनवे हा दाखल झाला आणि त्याने राहुल शर्मा याच्याकडील पार्सलवर पाय ठेवला. त्यावेळी राहुल याने चंद्रकांत यांना पार्सलवरुन पाय हटविण्यास सांगितले. त्यानंतर राहुल आणि चंद्रकांत यांच्यात बाचाबाची सुरू झाली. व नंतर सहा जणांनी मिळून राहुल यास मारहाण केली. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापेैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.