Narendra Modi – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून अशा कृतींमुळे भारताचा संकल्प कमकुवत होणार नाही, असे म्हटले आहे. कॅनडातील एका हिंदू मंदिरावर जाणूनबुजून हल्ला करण्यात आला असून त्याचा मी निषेध करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदींनी सोमवारी एक्स वर पोस्ट करत लिहिले, कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. भारताच्या मुत्सद्यांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न तितकाच भयंकर आहे.
I strongly condemn the deliberate attack on a Hindu temple in Canada. Equally appalling are the cowardly attempts to intimidate our diplomats. Such acts of violence will never weaken India’s resolve. We expect the Canadian government to ensure justice and uphold the rule of law.
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2024
अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही. कॅनडा सरकारने न्याय सुनिश्चित करणे आणि कायद्याचे राज्य राखणे आम्हाला अपेक्षित आहे.