नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 34 लोक ठार झाले आहेत, तर या हिंसाचारात 200 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती सामोर येते आहे.
सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर एक 13 वर्षीय शाळकरी मुलगी बेपत्ता आहे. ती शालेय परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती. बुधवारी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील मुलगी “खजुरी खास” येथून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे.
ती सोनिया विहार भागात तिच्या पालकांसमवेत राहते. सोमवारी सकाळी ती परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती, पण ती अद्याप परत आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.