जामा मस्जिद काही पाकिस्तानात नाही

दिल्ली पोलिसांना न्यायलयाने फटकारले

नवी दिल्ली : निदर्शने न करू द्यायला जामा मस्जिद काही पाकिस्तानात नाही. देशात कोणीही कोठेही शांततेत निदर्शने करू शकतात, असा शब्दात दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले.

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधिश कामिनी लूआ म्हणाल्या, आझाद हे एक राजकारणी आहेत. त्यांनी निदर्शने करण्यात चुक कायआहे? मी संसदेबाहेरही निदर्शने करत असल्याच्या अनेक घटना आणि व्यक्ती मी पाहिल्या आहेत. नागरिक शांततेत निदर्शने कोठेही करू शकतात, असे लुआ म्हणाल्या.

आझाद यांच्या विरोधातील पुरावे सादर करण्यात अपयश आल्याबद्दलही न्यायालयाने पोलिसांवर कोरडे ओढले. आझाद यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये का विरोधी निदर्शने करताना अटक करण्यात आली होती. आझाद यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचे पुरावे सादर करा, असे न्यायाधिशांनी ठणकावले. सहरणपूरमध्ये आझाद यांच्या विरोधात दाखल प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) आणावेत म्हणून ही सुनावणी उद्यापर्यंत तहकून ठेवण्यात आली.

अशा स्वरूपाचा जमाव जमा करण्याला मनाई असणारा एक तरी कायदा दाखवा… हिंसाचार कोठे आहे? तुम्ही निदर्शने करु शकणार नाही, असे कोण म्हणाले… तुम्ही राज्यघटना वाचली आहे का? निदर्शने करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. जामा मस्जिद पाकिस्तानात असल्यासारखे तुमचे वर्तन होते. जर ती पाकिस्तानात असती तर तेथे जाऊन निदर्शने करता आली असती कारण पाकिस्तान हा अखंड भारताचाच भाग होता. कोणत्या धार्मिक स्थळापुढे निदर्शने करता येणार नाहीत, असे सांगणारा एक तरी कायदा दाखवा, असे न्यायाधिशांनी सुनावले.

आझाद हे बहुदा आंबेडकरवादी आहेत. आंबेडकर हे मुस्लिम शिख आणि मुख्यत: समजाच्या दबलेल्या वर्गाच्या जवळचे होते. त्यांनी स्वत:च्या पध्दतीने बंड केले. आझाद यांना काय म्हणायचे आहे, याबाबत त्यांच्या कल्पना संदिग्ध आहेत. अंदाजावर तुम्ही विरोध करू शकत नाही. तुम्हाला हा मुद्दा उचलायचा असेल तर त्यावर संशोधन करा. त्याची येथे कमतरता दिसत आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

आझाद यांनी मेहमूद प्राचा या वकीलांमार्फत आपली याचिका दाखल केली आहे. त्यांना 21 डिसेंबर रोजी अटक केली आहे. त्यांना 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)