#IPL2020 : दिल्लीचा पंजाबवर “सुपर’ विजय

दुबई :- सुपर ओव्हर पर्यंत रंगलेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. मयंक आग्रवालने धडाकेबाज खेळी करत सामना पंजाबच्या बाजूने झुकवला होता. मात्र, तो बाद झाला. आणि दिल्लीने सामना टाय केला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पंजाबने 2 गडी गमावून 2 धावा केल्या होत्या. त्या सहज पार करत दिल्लीने विजय मिळवला. 

दिल्लीच्या मार्कस स्टोनिसने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्लीला 8 बाद 157 अशी समाधानकारक धावसंख्या गाठता आली. अचूक गोलंदाजीसमोर दिल्लीला एकेरी धावा घेणेही कठीण झाले होते. डावातील 17 व्या षटकांत त्यांचे धावांचे शतक पूर्ण झाले. मात्र, त्याचवेळी स्टोनिसने अचानक पंजाबच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्याच्या आक्रमणासमोर पंजाबचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन महागडा ठरला.

दिल्लीने अखेरच्या तीन षटकांत 57 धावा केल्या. स्टोनिसने 21 चेंडूत 7 चौकार व 3 षटकार फटकावताना 53 धावांची खेळी केली. त्याने केवळ 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यापूर्वी, दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने चुकीचा कॉल दिल्याने दुसरा सलामीवीर शिखऱ धवन धावबाद झाला. त्यानंतर वेगवान गोलंदाज महंमद शमी याने घेतलेल्या दोन बळींमुळे दिल्लीची अवस्था 3 बाद 13 अशी बिकट झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी चौथ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरायचा प्रयत्न केला.

पंतदेखील फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईच्या चेंडूवर बाद झाला व ही जोडी फुटली. पंतने 31 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार अय्यरही 39 धावांवर बाद झाला. त्यालाही शमीनेच बाद केले. यावेळी दिल्लीची 5 बाद 88 अशी अवस्था झाली होती. अत्यंत नियोजनबद्ध गोलंदाजी, त्याअनुरूप क्षेत्ररक्षण व गोलंदाजीत करण्यात आलेला बदल निर्णायक ठरला व दिल्लीच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्यात यशच आले नाही.

संक्षिप्त धावफलक :

दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 8बाद 157 धावा. (स्टोनिस 53, शमी 3- 15, कोट्रेल 2-24, ख्रिस जॉर्डन 0-56). किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 8 बाद 157 धावा (मयंक आग्रवाल 89)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.