दिल्लीच्या राजपथाचे लवकरच होणार सुशोभिकरण

2022 मध्ये नव्या राजपथावर होणार संचलन

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथावर होणारे संचलन हा सर्वच भारतीयांसाठी औत्सुक्‍याचा विषय असतो. पण लवकरच राजपथाच्या कायापालटाचे आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 2022 मध्ये होणारे संचलन नव्या राजपथावर होणार आहे. राजपथावरील सुधारणांचे आणि सुशोभीकरणाचे काम नोव्हेंबर 2021 पर्यंत संपवण्याचे केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन ते विजय चौक हा मार्ग राजपथ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 26 जानेवारीला या ठिकाणी संचलन होत असते. संचलनाची सुरुवात रायसीना हिल येथून होते आणि त्याचा शेवट इंडिया गेटजवळ होतो. ल्युटन्स दिल्ली म्हणूनही ओळखला जाणाऱ्या या भागाचा कायापालट करण्याचे केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे. यामध्ये 2022 पर्यंत संसद भवनाचा कायापालट केला जाईल. त्याचबरोबर सर्व सरकारी कार्यालयांसाठी एकात्मिक कॉम्प्लेक्‍स 2024 पर्यंत उभारण्याचे सरकारने निश्‍चित केले आहे. त्यामध्ये राजपथाचाही कायापालट करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)