जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खानला 26 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान याला 26 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सज्जाद खान हा पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.

सज्जाद खान या दहशतवाद्याची पोलीस कोठडी पुर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला शुक्रवारी विशेष न्यायालयात सादर केले होते.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने गुरुवारी( 21 मार्च) मध्यरात्री लाल किल्ला परिसरातून अटक केली होती.

जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागचा सुत्रधार मुदस्सिर अहमद खान हा होता. भारतीय जवानांनी त्याला एका चकमकीत ठार केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.