रंगतदार लढत अपेक्षित
स्थळ – मुंबई
वेळ – रात्री 7-30 वा.
मुंबई – उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखविणारा संघ म्हणून गुजरात फॉर्च्युनजाएंट्सची ख्याती आहे. प्रो कबड्डीत लागोपाठ तिसरा सामना जिंकण्यासाठी त्यांना आज येथे दबंग दिल्लीच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
गुजरातने आतापर्यंत झालेले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामध्ये रोहित गुलिया, मोहम्मद हुसेन व गुरविंदरसिंग यांनी मोठा वाटा उचलला आहे. त्यांना या स्पर्धेत जरी विजेतेपद मिळविता आले नसले तरी अजिंक्यपदाची क्षमता असलेला संघ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यादृष्टीनेच दिल्ली संघाला सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे. सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर दिल्लीने हरयाणा स्टीलर्स संघावर शानदार विजय मिळवित अपेक्षा उंचावल्या आहेत.
गुजरात फॉर्च्युनजाएंट्स
बलस्थाने – सांघिक कौशल्यपूर्ण खेळाबाबत माहीर,
पल्लेदार चढाया करणाऱ्यांची मांदियाळी
कच्चे दुवे – पकडीमध्ये अक्षम्य चुका,
शेवटच्या मिनिटांमध्ये घाई
दबंग दिल्ली
बलस्थाने – खोलवर चढायांमध्ये चांगले यश,
खेळाडूंमध्ये योग्य समन्वय
कच्चे दुवे – चढायांवर नियंत्रणाचा अभाव,
पकडींमध्ये नकळत होणाऱ्या चुका