ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी आज समाजवादी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सूत्रांनुसार, जया प्रदा यांना भाजप उत्तरप्रदेशमधून रामपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तर रामपूर येथून समाजवादी पक्षातर्फे आझम खान उमेदवार आहेत.

जया प्रदा म्हणाल्या कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. मी आजपर्यंत जे कामे केले ते मनापासून केले आहे. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचेही आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.