Delhi Triple Murder: दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज (4 डिसेंबर 2024) सकाळी अज्ञात व्यक्तींनी पती, पत्नी आणि मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. यावेळी मुलगा मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. परत आल्यावर तिघांचा खून झाल्याचे त्याने पाहिले. मृतांमध्ये राजेश कुमार (53 वर्ष), पत्नी कोमल (47) आणि मुलगी कविता (23 ) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. राजेश हे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. आज राजेश यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं बोललं जात आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलीसांचा तपास सुरू –
दक्षिण दिल्लीतील नेब सराय पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेबाबत स्थानिक लोकांनी सांगितले की, मृताचा मुलगा पहाटे फिरायला गेला होता. घरी परतल्यावर त्याला आई, वडील आणि बहिणीवर चाकूने वार केल्याचे दिसले.
शेजाऱ्यांनी सांगितले की, घराच्या मुख्य दरवाजाला आतून आणि बाहेरून इंटरलॉक यंत्रणा बसवली होती. अशा स्थितीत मारेकरी घरात घुसले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे लोक मूळचे हरियाणाचे असले तरी दक्षिण दिल्लीतील देवळी गावात वर्षानुवर्षे राहत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
#WATCH | Delhi: Three people from a house including a man, his wife and daughter, in the Neb Sarai area of South Delhi were stabbed to death. More details awaited: Delhi Police
(Visuals from the spot) pic.twitter.com/aYSU48aC1G
— ANI (@ANI) December 4, 2024
दिल्लीकरांना सुरक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी – मुख्यमंत्री आतिशी
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी या घटनेबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, आज सकाळी नेब सराई येथे तिहेरी हत्या झाली. दिल्लीत दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. गोळ्या झाडल्या जात आहेत, ड्रग्जची खुलेआम विक्री होत आहे. केंद्र सरकार दिल्लीतील जनतेला सुरक्षा प्रदान करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
आज सुबह नेब सराई में ट्रिपल मर्डर हुआ। दिल्ली में दिन दहाड़े हत्याएं हो रही हैं, गोलियाँ चल रही रही हैं, खुलेआम ड्रग्स बिक रहे हैं।
केंद्र सरकार की दिल्ली में एक ही ज़िम्मेदारी है – दिल्ली वालों को सुरक्षा देना। वो अपनी ज़िम्मेदारी में पूरी तरह फेल हैं। https://t.co/YcQ0KBe2Db
— Atishi (@AtishiAAP) December 4, 2024