Delhi School Bomb Threat । आज सकाळी आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूलसह अनेक शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला. ही माहिती मिळताच शाळेत एकच गोंधळ उडाला. शाळेच्या व्यवस्थापनाने तत्काळ दिल्ली पोलिस आणि अग्निशमन विभागाला धमकीच्या ईमेलची माहिती दिली. पोलिसांच्या पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.
शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल Delhi School Bomb Threat ।
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. शाळा व्यवस्थापनाने सकाळी 6.00 वाजता दिल्ली अग्निशमन विभागाला माहिती दिली, त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दल शाळेच्या कॅम्पसमध्ये पोहोचले आणि तपास सुरू केला.
#WATCH | Delhi: Visuals from outside of DPS RK Puram – one of the schools that receive bomb threats, via e-mail, today morning pic.twitter.com/UrOddv8JnC
— ANI (@ANI) December 14, 2024
आठवडाभरात धमकीची तिसरी घटना Delhi School Bomb Threat ।
दरम्यान, याआधी शुक्रवारी दिल्लीच्या पूर्व कैलाश डीपीएस, सलवान पब्लिक स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूललाही बॉम्बची धमकी मिळाली होती. त्याचवेळी, यापूर्वी सोमवारी दिल्लीतील सुमारे 40 शाळांना अशाच प्रकारे लक्ष्य करून त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आठवडाभरात धमकीची ही तिसरी घटना आहे.
हेही वाचा
दुपारी अटक अन् संध्याकाळी जामीन मंजूर…; अल्लू अर्जुनसोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती