Delhi Pollution – मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभेत भाजप सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. २०२५-२०२६ या वर्षासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर अधिक भर दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, दिल्लीतील लोक प्रदूषणामुळे चिंतेत आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यावरण आणि प्रदूषणावर अधिक भर !
मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण सुधारण्यासाठी ५०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर दुसरीकडे प्रदूषणमुक्तीसाठी ३०० कोटी रुपये मंजुर
केले आहेत. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि प्रदूषण नियंत्रण यावर भर देण्यात आला आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, प्रदूषण देखरेख प्रणाली आणि हिरवळ वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. आमचे सरकार दिल्लीतील हवामान बदलाच्या हवेच्या गुणवत्तेवर काम करेल.
सीएम गुप्ता यांनी अर्थसंकल्पादरम्यान सांगितले की, यावेळी अर्थसंकल्पात आमचे लक्ष पायाभूत सुविधांवर असेल. दिल्लीसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे.
दिल्लीचे नवीन सरकार ऐतिहासिक जनादेश घेऊन आले आहे आणि त्या आधारावर काम करेल. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील लोकांना स्वच्छ यमुना नदीचे आश्वासन दिले आहे. आम्ही ते पूर्ण करू.
अशा आहेत अन्य तरतुदी :
१. महिला समृद्धी योजनेसाठी ५१०० कोटी रुपये
२. सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठी ५०० कोटी
३.१०० ठिकाणी अटल कॅन्टीनसाठी १०० कोटी
४. नागरिकांना १० लाख रुपयांचा विमा
५. जन आरोग्य योजनेतला ५ लाखांचा अतिरिक्त विमा
६. महिलांना दरमहा २५०० रुपये
७. गर्भवती महिलांसाठी २१० कोटी
८. झोपडपट्ट्यांसाठी ६९६ कोटींची तरतूद
९. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी ९००० कोटी
१०. यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी ५०० कोटी
११. पर्यावरण सुधारण्यासाठी ५०६ कोटी
१२. प्रदूषणापासून मुक्ततेसाठी ३०० कोटी